सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच मिळणार पीएलआय
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सरकारी बँक खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण पुढील आर्थिक वर्षात या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासह पीएलआय (PLI) सुद्धा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी बँक व्यवस्थापनांनी व्हेरिएबल पे किंवा परफॉर्मन्स लिंक्ड पे संबंधित एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार खासगी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे आधीपासून दिला जात आहे.

तर युनायटेड फोर ऑफ बँक युनियन्स यांनी सरकारी बँक कर्मचाऱ्यांना पीएलआय देण्याच्या प्रस्तावाला मंजूरली दिली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनासोबत पीएलआय दिल्याने सुसूत्रता येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेचे वार्षिक अहवाल जाहीर झाल्यानंतर पीएलआय कर्मचाऱ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे.(कंप्युटर सहाय्यक पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया)

 इंडियन बँक असोसिएशनने असे स्पष्ट केले आहे की, पीएलआय वेतनामध्ये सहभागी केला जाणार नाही आहे. मात्र ते वेतनाच्या व्यतिरिक्त दिले जाणार आहे. त्यामुळे बँक असोसिएशनच्या पगारात 12 टक्क्यांची वाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे.परंतु बँक संघटना पगारात 15 टक्क्यांनी किमान वाढ करावी या निर्णयावर ठाम आहेत.सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर द्विपक्षीय करार दर पाच वर्षांनी होतो. वेतनवाढीच्या 11 व्या कराराबाबत सध्या चर्चा सुरू आहे.