जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण उत्तर प्रदेश लोक सेवा आयोग (युपीपीएससी) च्या कप्युटर सहाय्यक पदासाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर 16 डिसेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या नोकर भरतीमध्ये एकूण 14 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच अर्जाचे शुल्क करण्यासाठी शेवटची तारीख 11 डिसेंबर पर्यंत असणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांना 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये सामान्य हिंदी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि कंप्युटर्स संबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत. उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दीड तासाचा वेळ देण्यात येणार आहे. तसेच टायपिंग टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे. कप्युटर सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-40 वर्ष असावे.
तसेच कप्युटर सहाय्यता नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12 वी पास, कंप्युटर सायन्समध्ये डिप्लोमा, ओ लेव्हल डिप्लोमा केलेला असावा. तर ओबीसी, अनारक्षित, ईडब्लूएस यांना अर्जासाठी 125 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच एससी, एसटी - 65 रुपये आणि दिव्यांगासाठी 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. या नोकरीच्या वेतनाबाबत बोलायचे झाल्यास निवड केलेल्या उमेदवारांना 5200 ते 20,200 रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.
तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 380 रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकर भरती इंडियन ऑइलच्या अप्रेसिंग पदासाठी असणार आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2019 ठेवण्यात आली आहे.