Indian Oil मध्ये 380 पदांसाठी नोकर भरती, 12 पास ते पदवीधर करु शकतात अर्ज
Indian Oil (Photo Credits-Facebook)

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असल्यास ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये 380 रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकर भरती इंडियन ऑइलच्या अप्रेसिंग पदासाठी असणार आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2019 ठेवण्यात आली आहे. इंडियन ऑइलसाठी नोकर भरती संपूर्ण देशभर असणार आहे.अर्जदारांना 1 वर्षाचा अप्रेसिंग ट्रेनिंग म्हणून निवड केले जाणार आहे. तर या पदासाठी 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विविध पदांवर विविध योग्यतेनुसार निवड केली जाणार आहे. तर जाणून घ्या इंडियन ऑइल मध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज भासणार आहे.

>>पदांची संख्या

380

>>योग्यता

12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. योग्यताबाबत अधिक माहितीसाठी ऑफिशल नोटिफिकेशन पहावे.

>>वयाची अट

उमेदवाराचे कमीतकमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 21 वर्ष असावे.

(मुंबई: महापालिकेत 341 इंजिनियरिंग पदाची भरती, संपूर्ण माहिती घ्या जाणून)

उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. त्याचसोबत एकुण 100 प्रश्न असून त्यासाठी 100 गुणांचा पेपर असणार आहे. तसेच पेपर लिहिण्यासाठी उमेदवारांना 2 तास वेळ देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना plis.indianoilpipelines.in या वेबसाईटवरुन अर्ज करता येणार आहे.