
सोना-चांदी (Gold-Silver Price) दर आज (20 सप्टेंबर) पुन्हा एकदा पाठिमागील सहा महिन्यांच्या इतिहासात सर्वाधिक घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व्यवहारांचा परिणाम स्थानिक सोने बाजारातही पाहायला मिळतो आहे. त्यामुळे सराफा बाजार काहीसा सोन्याची घसरण पाहतो आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 34 पैशांनी घसरला त्यामुळे त्याची किंमत 73.82 रुपये झाली आज सुरुवातीच्या व्यवहारांवर नजर टाकता मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये सोने 0.13% घसरले. त्यामुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,928 रुपये इतकी पाहायला मिळाली. तर चांदीही आज 59,427 रुपये प्रति किलो ग्रॅम इतक्या दराने विकली जात आहे.
यूएस फेडरल रिजर्व बँक या आठवड्यात एक बैठक घेत आहे. या बैठकीवर गुंतवणुकदारांची बारीक नजर आहे. आज सोन्याच्या आंतराष्ट्रीय बजारपेठेत 0.1% घट पाहयला मिळाली. ही घट 1,752.66 डॉलर प्रति औंस इतकी होती. GoldPrice.org ने दिलेल्या माहितीनुसार आंतररष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 11.04 वाजता MCX वर गोल्ड मध्ये 0.21% तेजी दिसत होती. सोने धातू 1750.50 डॉलर प्रति औंस वर ट्रेण्ड करत होता. तर चांदीर 0.14% नी घसरल्याचे पाहायला मिळत होते. चांदी 22.34 डॉलर प्रति औंस इतक्या दरावर होती. (हेही वाचा, Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून)
भारतातील प्रमुख शहरांतील सोने चांदी दर
दिल्ली:
22 कॅरेट- 45,550 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 49,690 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई:
22 कॅरेट- 45,390 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 46,390 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
कोलकाता:
22 कॅरेट- 45,650 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 48,350 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चेन्नई:
22 कॅरेट- 43,550 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 47,510 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
दरम्यान, चांदी 59,300 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. दिल्लीत चांदी 59,300 रुपए प्रति किलो आहे. मुंबई आणि कोलकाता शहरांतही चांदीचा दिल्ली प्रमाणेच समान भाव आहे. चेन्नई मध्ये मात्र चांदी 63,500 रुपए प्रति किलो आहे.