Gold-Silver Price Today: मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या शहरांमधील सोने-चांदी दर घ्या जाणून
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

पेट्रोल, डिझेल (Petrol and Diesel Price) आणि सीएनजी, पीएनजी (CNG, PNG Price) दरांप्रमाणे सोने-चांदी दर (Gold-Silver Price Today) सतत बदलत राहतात. त्यामुळे प्रतिदिन सोने चांदी दर काय आहेत हे जाणून घेणे हे अनेकांचा नित्यक्रम. आज म्हणजेच मंगळवार (5 ऑक्टोबर 2021) या दिवशी सोने काहीसे अधिक उजळताना दिसले. डॉलर काहीसा अधिक मजबूत झाला असला तरी डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने आणि कच्चा तेल बाजारात तेजी आल्याने आज सोन्याला काहीसी झळाली मिळाली. मात्र, आगामी काळात सोने आणखी महाग होण्याची चिन्हे आहेत. येऊ घातलेले सण उत्सव पाहता स्थानिक बाजारात सोन्याची मागणी अधिक वाढू शकते. त्यामुळे सोने दरात वधार पाहायला मिळू शकतो.

मंगळवारी मल्टी कमोडीटी एक्सचेंज वर गोल्ड फ्यूचरमध्ये 0.25% घसरण नोंदली गेली. या वेळी सोने धातून 46,768 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. तर चांदी फ्यूचर 0.54 घसरुन 60,625 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती. GoldPrice.org वर पाहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 10.22 वाजता MCX वर सोन्यात 0.54% घसरण पाहायला मिळाली.त्यावेळी धातू 1758.75 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. तर चांदी 0.86% च्या घसरणीसह 22.42 डॉलर प्रति औंसवर होती. (हेही वाचा, Petrol, Diesel Prices Today: आज पुन्हा इंधन दरवाढ; पहा पेट्रोल, डिझेलचे दर काय?)

देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली

22 कॅरेट- 45,650 रुपये

24 कॅरेट- 49,800 रुपये

मुंबई

22 कॅरेट- 45,490 रुपये

24 कॅरेट- 46,490 रुपये

कोलकाता

22 कॅरेट- 46,000 रुपये

24 कॅरेट- 48,700 रुपये

चेन्नई

22 कॅरेट- 43,050 रुपये

24 कॅरेट- 48,060 रुपये

चांदी दराबाबत बोलायचे तर चांदी 60,600 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. दिल्लीमध्ये चांदी 60,600 रुपए प्रति किलो रुपये प्रति किलो. तर, मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी 60,600 रुपए प्रति किलो याच दराने विकली जात आहे. चेन्नई मध्ये मात्र चांदी 64,800 रुपए प्रति किलो दरावे विकली जात आहे.