Fuel Prices | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पेट्रोल (Petrol),डिझेलच्या ( Diesel) किंमतींमध्ये आज (5 ऑक्टोबर) पुन्हा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे भाव देशामध्ये एका दिवस स्थिर राहिल्यानंतर 25 पैसे तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले आहेत. भारत देश हा त्यांची 85% तेलाची गरज पुरवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे इंटरनॅशनल ऑईल किंमतींचा इंधनदरांवर परिणाम होत आहे.

भारतामध्ये दररोज सकाळी 6 च्या सुमारास इंधनदर ऑईल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. त्याच्यानंतर प्रत्येक शहरागणिक लोकल टॅक्सच्या आधारे, किंमती ठरवल्या जातात. परिणामी प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोल, डिझेलच्या वेगवेगळ्या किंमती आहेत. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून).

भारतामध्ये आजचा पेट्रोल, डिझेलचा दर

  • दिल्ली - पेट्रोल Rs 102.64/ltr आणि डिझेल Rs 91.07/ltr
  • मुंबई - पेट्रोल Rs 108.67 आणि डिझेल Rs 98.80/ltr
  • कोलकाता - पेट्रोल Rs 103.36/ltr आणि डिझेल Rs 94.17/ltr
  • चैन्नई - पेट्रोल Rs 100.23/ltr आणि डिझेल Rs 95.59/ltr

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुड हे $78 पर बॅरेल पेक्षा जास्त आहे. भारतामध्ये इंधनदरांमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. ही वाढ 41% केवळ एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी आहे. मध्यंतरी काही काळ त्याच्या किंमतींमध्ये घट करण्यात आली होती. पण बराच काळ ऑईल कंपन्यांनी हे दर स्थिर ठेवले आहेत.