
अंतरराष्ट्रीय सोने बाजारात झालेल्या दरांच्या घसरणीचा काहीसा परिणाम भारतीय सोने (Gold-Silver Price Today ) बाजारातही पाहायला मिळाला. आज (1 ऑक्टोबर 2021) सकाळीच मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर गोल्ड फ्यूचर 143 रुपये (0.31%) घसरणीसह 46,180 रुपये प्रति 10 ग्राम इतका पाहायला मिळाला. सिल्वर फ्यूचर मध्ये 0.39% घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलो 59,387 रुपयांवर आला. गुरुवारी स्थानिक बाजारात चांदी दरात घसरण पाहायला मिळाली. सोने चांदी दराबाबत GoldPrice.org ची आकडेवारी पाहायचे तर अंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 11:44 वर MCX सोने 0.2% घररणीवर होते.
Good Returns वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेटच्या प्रति एक ग्रॅम सोने दर 4,584, 8 ग्रॅम 36,672, 10 ग्रॅम (प्रति तोळा) 45,840 आणि 100 ग्रॅम (10 तोळे) सोने दर 4,58,400 रुपये दराने विकले जात आहे. त्याच तुलनेत 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 44,840 रुपये दाने विकले जात आहे. (हेही वाचा, Health insurance: हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? आरोग्य विमा का आवश्यक असतो?)
देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली
22 कॅरेट- 45,700 रुपये
24 कॅरेट- 49,800 रुपये
मुंबई
22 कॅरेट- 44,840 रुपये
24 कॅरेट- 45,840रुपये
कोलकाता
22 कॅरेट- 46,050 रुपये
24 कॅरेट- 48,800 रुपये
चेन्नई
22 कॅरेट- 43,920 रुपये
24 कॅरेट- 47,910 रुपये
देशात चांदी जवळपास 59,500 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. दिल्लीमध्ये चांदी 59,500 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. मुंबई आणि कोलकाता शहरांतही चांदीचा हाच ( 59,500 रुपए प्रति किलो) दर आहे. चेन्नईमध्ये चांदी 63,700 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे.