उघड्यावर पडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट (Gelatin Sticks Explode in Parbhani) होऊन 2 शाळकरी मुलं जखमी झाली आहेत. ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर (Jintur) शहरात घडली. परिसरात खेळत असताना या दोन्ही मुलांना उघड्यावर पडलेल्या जिलेटीनच्या कांड्या (Gelatin Sticks) सापडल्या. या कांड्या त्यांनी घेऊन त्याच्या वायरी मोबाईलच्या बॅटरीला जोडल्या. मुलांच्या या उपोद्यापामुळे जिलेटीन कांड्यांचा मोठा स्फोट (Blast) झाला. यात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. बुधवारी (13 एप्रिल) सकाळी दहा वाजणेच्या सुमारास ही घटना घडली.
स्फोटामुळे जखमी झालेल्या मुलांचे डोळे आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेख असलम वय (11वर्ष) व अनस शाहेद पठाण (9 वर्ष) अशी जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. दोघेही शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहमारे आहेत. घराजवळ खेळत असताना रस्त्यालगत असलेल्या कचऱ्यात दोघांनाही मोठ्या प्रमाणावर वायर असलेल्या कांड्या आढळून आल्या. या कांड्या त्यांनी वायरसह जोडल्या. ते इतक्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी या कांड्यांच्या वायर घरातील जुन्या मोबाईलच्या बॅटरीला जोडल्या. त्यामुळे या कांड्यांचा जागेवरच स्फोट झाला. (हेही वाचा, मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शालिमार एक्स्प्रेस मध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या आरोपीला अटक; प्रेमसंबंधातून रचला बनाव)
परभणी जिल्ह्यात जिलेटीन कांड्यांचा स्फोट होऊन २ शाळकरी मुलं जखमी, ही दोन्ही मुलं उघड्यावर पडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांशी खेळत असताना, त्यांचा स्फोट झाला. या दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.@InfoParbhani
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 14, 2022
अस्लम शेख हा हातात जिलेटीनच्या कांड्या घेऊन उभा होता. त्यामुळे त्याच्या हाताला आणि डोळ्याला इजा झाली. तर जवळच असलेल्या अनस पठान याच्याही डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. स्फोटाचा आवाज ऐकून घटनास्थळी आलेल्या नागरिकांनी दोघांनाही जवळच्या शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शाळकरी मुलांना उघड्यावर जिलेटीनच्या कांड्या मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धक्कादायक म्हणजे पोलीसही या प्रकाराबाबत अनभीज्ञ असल्याचे दिसून आले. जिलेटीन हे स्फोटक असल्याने अत्यंत काळजीपूर्वक वापरावे लागते. त्यामुळे ते जे लोक वापरतात त्यांनी योग्य काळजी न घेता उघड्यावर कसे काय टाकून दिले? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.