Dr Manmohan Singh यांना दिल्लीच्या AIIMS रूग्णालयातून डिस्चार्ज
Dr Manmohan Singh (Photo Credits: IANS)

 Dr Manmohan Singh Health Update:  भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांना आज (12 मे) दिल्ली येथील एम्स रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान 87 वर्षीय मनमोहन सिंग यांना रविवार, 10 मे दिवशी रात्री छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीवरून भर्ती करण्यात आलं होतं. एम्स रूग्णालयात त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये त्यांना जीवघेण्या कोरोना वायरसची लागण आहे की नाही? याची देखील तपसणी करण्यात आली.

दरम्यान रविवारी एम्समध्ये जेव्हा मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांची कोव्हिड 19ची देखील चाचणी करण्यात आली. डॉ. सिंग नितिश नायक यांच्या देखरेखीखाली होते. काल त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले. मनमोहन सिंग यांचा कोव्हीड 19 चाचणीचा रिपोर्टदेखील निगेटीव्ह आला आहे.

डॉ. मनमोहन सिंग एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज

मीडिया रिपोर्टनुसार, डॉ. सिंग यांना नव्या औषधाची रिअ‍ॅक्शन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 2009 साली डॉ. सिंग यांच्यावर बायपासचं ऑपरेशन झालं आहे. मात्र आता एम्सच्या डॉक्टरांच्या सल्लाने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.