Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर; आर्मी रुग्णालयाची माहिती
Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. राजधानी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाने एका प्रतिक्रियेदरम्यान सांगितले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता भारतीय लष्कराच्या रुग्णालयात (R & R) दाखल करण्यात आले. अधिक माहिती देताना रुग्णालयाने सांगितले की, माजी राष्ट्रपती मुखर्जी यांची तपासणी केली असता त्यांच्या डोक्यातगाठ असल्याचे निष्पन्न झाले. (Pranab Mukherjee Health Update) त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हँटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांची स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे.

दरम्यान, या आधी 84 वर्षांच्या मुखर्जी यांनी ट्विट करत म्हटले की, मला काही कारणांमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. इथे माजी कोरोना व्हायरस चाचणी पॉझीटिव्ह आली. प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये पुढे असेही म्हटले की, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी स्वत:ची कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी. तसेच, क्वारंटाईनही व्हावे. प्रणव मुखर्जी हे प्रदीर्घ काळ केंद्र सरकारमध्ये सक्रीय राहिले आहेत. ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत देशाचे राष्ट्रपती पदही भूषवले आहे. (हेही वाचा,Pranab Mukherjee on Ventilator: कोरोना विषाणू संक्रमित माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; आर्मीच्या रुग्णालयात उपचार सुरू )

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.