Mridula Sinha Passes Away: गोव्याच्या माजी राज्यपाल, ज्येष्ठ भाजप नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन
Mridula Sinha | (Photo Credits: Facebook)

गोवा राज्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा (Mridula Sinha Passes Away) यांचे निधन झाले आहे. मृदुला सिन्हा ( Mridula Sinha ) यांच्या निधनामुळे भाजपमध्ये दु:ख व्यक्त केले जात आहे. मृदृला सिन्हा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1942 मध्ये बिहार राज्यातील मुजफ्फरपुर जिल्ह्यात झाला. त्या एक प्रसिद्ध अशा हिंदी लेखिका होत्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्य समितीच्या सदस्याही होत्या. 'पाँचवाँ स्तंभ' नावाचे एक सामाजिक साप्ताहिकही त्या चालवत असत. गेली अनेक वर्षे त्या भाजपमध्ये कार्यरत होत्या. पक्ष संघटना तसेच इतरही विविध पदांवर त्यांनी काम केले होते.

मृदुला सिन्हा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातन व्यक्त केल्या आहेत. श्रीमती मृदुला सिन्हाजी लोकसेवेच्या प्रयत्नांसाठी कायम लक्षात राहतील. त्या  एक निपुण लेखिका होत्या.  साहित्याबरोबरच संस्कृतीतही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांबद्धल सहानभुती आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (हेही वाचा, Prayagraj: धक्कादायक! फटाक्यांमुळे भाजल्याने भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या 8 वर्षीय नातीचा उपचारादरम्यान मृत्यू)

दरम्यन, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही मृदुला शाह यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे. मृदुला सिन्हा यांनी राष्ट्र, समाज आणि संघटन यांसाठी आयुष्यभर काम केले. त्या एक निष्णात लेखिकाही होत्या. त्यांना त्यांचे लिखाण आणि कार्य याच्या माध्यमातून आठवणीत ठेवले जाईल. त्यांच्या निधनाबद्धल माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे.

मृदुला सिन्हा यांच्याकडे पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचे अध्यक्ष पद होते. त्यांच्या एका पुस्तकावर राजमाता विजया राजे सिन्धिया यांच्यावर आधारीत एक राणी ऐसी भी हा चित्रपटही आला होता.