फ्लिपकार्ट कंपनीचे संस्थापक सचिन बन्सल यांनी भरला Advance Tax
Flipkart co-founder Sachin Bansal | (Archived and representative images)

फ्लिपकार्ट कंपनीचे संस्थापक (Flipkart Founder ) सचिन बन्सल (Sachin Bansal) यांनी 2018-19 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 999 कोटी रुपयांचा अग्रिम कर भरणा केला आहे. कराच्या या रकमेमध्ये अमेरिका येथील रिटेल वॉलमार्टला फ्लिपकार्टची भागिदारी विकल्यानंतर (Flipkart-Walmart deal) आलेल्या पैशातील उत्पनावरील गेन टॅक्सही समाविष्ठ आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल (Binny Bansal) यांनीही वॉलमार्टला (Walmart) आपली भागिदारी विकली होती. परंतू. त्यांनी आतापर्यंत या बाबतीत कोणताही खुलासा केला नव्हता. तसेच, वॉलमार्टला विकलेल्या शेअर्समधून त्यांना किती फायदा झाला याबाबतही त्यांनी माहिती दिली नव्हती.

फ्लिपकार्टने अमेरिकेची रिटेलर वॉलमार्टला आपली भागिदारी विकल्यानंतर त्यांना किती रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले याची माहती त्यांनी प्राप्तिकर विभागाला (इनकम टॅक्स) दिली नव्हती. तसेच, हा कर भरणा करताना कोणता फॉर्म्युला वापरण्यात आला याचीही माहिती त्यांनी जाहीर केली नाही. 699 कोटी रुपयांचा अग्रिम कर भरणा केल्यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सचिन आणि बिन्नी बन्सल तसेच, फ्लिपकार्टची भागिदारी विकणाऱ्या इतर भागधारकांनाही निटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये शेअर विक्रीबाबत अधिक माहिती देण्याबद्दल सांगण्यात आले आहे. (हेही वाचा, Amazon आणि Flipkart वरील महासेलवर केंद्र सरकारकडून बंदी)

दरम्यान, अशाच प्रकारचे एक नोटीस इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून वॉलमार्टलाही गेले आहे. या नोटिसमध्ये फ्लिपकार्टच्या विदेशी भागधारकांसह विदहोल्डिंग टॅक्स भरण्याबबत सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी शेअर होल्‍डर्सनी इनकम टॅक्स विभागाला 7,439.40 कोटी रुपये विदहोल्डींग टॅक्स रुपाने भरले होते. इनकम टॅक्स डिपार्टमेंटला अपेक्षा आहे की, ही रक्कम अधिक असण्याची शक्यता आहे.