Fire Erupt in Noida: नोएडा (Noida) च्या सेक्टर 27 मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका घरात भीषण आग (Fire) लागली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिकल बोर्डमधून ही आग लागली. प्राप्त माहितीनुसार, घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग झपाट्याने पसरली. त्यामुळे सिलिंडरचाही स्फोट झाला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच सेक्टर 20 पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी रामबदन सिंह यांनी सांगितले की, सेक्टर 27 मध्ये असलेल्या चार मजली घराच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. आग लागल्याचे समजताच पहिल्या मजल्यावर राहणारे लोक सुखरूप बाहेर आले, मात्र धुरामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन महिला बेशुद्ध झाल्या. (हेही वाचा -Mumbai Fire: घाटकोपर येथील निवासी इमारतीला आग, 13 जण जखमी, रुग्णालायत उपचार सुरु)
नोएडामध्ये फटाके आणि गॅस सिलिंडरच्या स्फोटोमुळे भीषण आग, पहा व्हिडिओ -
#Noida थाना सेक्टर 20 क्षेत्र के सेक्टर 27 स्थित एफ ब्लॉक मे 3 मंजिला मकान में लगी आग।बिजली बोर्ड में शॉर्ट सर्किट और घर में पटाखे रखने के कारण लगी आग। @noidapolice @DCP_Noida @Acp1Noida @rwa_27 @cfonoida pic.twitter.com/HMnbz6kSYx
— harinder singh (@harinder_up16) October 11, 2024
आगीनंतर तपास मोहिमेदरम्यान गोरखपूरची रहिवासी श्वेता सिंह आणि दुसऱ्या मजल्यावर राहणारी तिची चुलत बहीण नम्रता सिंग धुरामुळे बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यानंतर दोघांनाही तातडीने जवळच्या कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान श्वेता सिंहचा मृत्यू झाला. नम्रता सिंग यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Mumbai Fire: मुंलूड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू)
दरम्यान, सेक्टर-20 पोलीस स्टेशनने घटनेचा तपास सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे. प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगण्यात येत असले तरी सविस्तर तपासानंतरच संपूर्ण माहिती समोर येईल.