Fact Check: ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून वसूल केले जातायत अधिक पैसे? रेल्वेने दिले स्पष्टीकरण
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

Fact Check:  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षातील मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बहुंतांश रेल्वे आता नागरिकांसाठी सुरु झाल्या आहेत. कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम असली तरीही लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून नागरिक प्रवास करत आहेत. याच दरम्यान आता काही रिपोर्ट्स समोर आले आहेत की, ज्यामध्ये रेल्वे कडून प्रवाशांकडून ट्रेनसाठी अधिक पैसे घेतले जात असल्याचे समोर आले होते. याच संदर्भात आता रेल्वेकडून स्पष्टीकरण दिले गेले आहे.(CSMT-Delhi सुपरफास्ट वन वे स्पेशल ट्रेन आज मध्य रेल्वेवर धावणार; इथे पहा थांबे, बुकिंग डिटेल्स)

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत असे म्हटले की, अधिक पैसे वसूल केले जात असल्याचे रिपोर्ट हे दिशाभूल करणारे आहेत. यावर अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले की, सणानिमित्त प्रवासी ट्रेनची वाढती मागणी पाहता फेस्टिव्हल ट्रेन चालवल्या जात आहेत. गर्दी कमी करण्यासाठी या ट्रेन सातत्याने चालवल्या जात आहेत. व्यवस्थेनुसार, अशा ट्रेनचे भाडे 2015 नंतरच अधिक केले गेले आहे. या वर्षात कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही.(Train Update: मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस येत्या 19 जानेवारी पासून दररोज धावणार)

 Tweet:

रिपोट्स मध्ये असे म्हटले होते की, जनरल क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट हे रिझर्वेशन शिवाय मिळणार नाही. हा प्रवास कमी पल्ल्यासाठी का असो त्यांना सुद्धा तिकिट दिले जाणार नाही. तसेच ट्रेन येण्याच्या अर्धा तासापूर्वी तिकिट विंडो सुरु होणार असून तेथे प्रवाशांना रिझर्वेशन असलेले तिकिट दिले जाणार आहे.

दरम्यान, रेल्वेकडून कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्च पासून बंद असलेल्या ट्रेन नियमांनुसार चालवल्या जात आहेत. कोरोनाच्या काळात भारतीय रेल्वेने ट्रेन सुरु केल्या होत्या. पण 60 टक्के क्षमतेसह प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहचवले जात होते. सध्या एकूण 1058 मेल एक्सप्रेस, 4807 उपनगरीय सेवा आणि 188 प्रवासी ट्रेन दररोज चालवल्या जात आहेत.