Representational Image (Photo Credits: PTI)

Train Update: भारतीय रेल्वेकडून ट्रेन क्रमांक 01221/01222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट ही आता येत्या 19 जानेवारी पासून दररोज प्रवाशांसाठी धावणार आहे. सध्या आता आठवड्यातून चार दिवसच चालवली जात आहे. गाडी क्रमांक 01221 राजधानी सुपर फास्ट स्पेशल ही सीएसएमटी स्थानकातून दररोज दुपारी 4 वाजता सुटणार आहे. तर हजरत निजामुद्दीन ही पुढील दिवशी सकाळी 9.55 वाजता पोहचणार आहे.(IRCTC Train Reservation: भारतीय रेल्वे तिकीट बुकींग नियमांमध्ये बदल, शेकडो प्रवाशांना होणार मदत)

गाडी क्रमांक 01222 राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ही हजरत निजामुद्दीन दुपारी 4.55 वाजता दररोज येत्या 20 जानेवारी पासून सोडली जाणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सीएसएमटी स्थानकात सकाळी 11.15 मिनिटांनी पोहचणार आहे. गाड्यांच्या हॉल्ट मध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही.(CSMT-Delhi सुपरफास्ट वन वे स्पेशल ट्रेन आज मध्य रेल्वेवर धावणार; इथे पहा थांबे, बुकिंग डिटेल्स)

Tweet:

राजधानी एक्सप्रेससाठी तिकिट बुकिंग वाढवण्यासाठी 14 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. यासाठी नागरिकांना www.irctc.co.in वर भेट देऊन तिकिट बुकिंग करता येणार आहे. तर राजधानी एक्सप्रेस बद्दलच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅप डाऊनलोड करावा असे सांगण्यात आले आहे. तर ज्या प्रवाशांची आरक्षित तिकिटे असणार त्यांनाच स्पेशल ट्रेनने प्रवास करता येणार आहे.