तुम्ही जर रेल्वे प्रवास करण्यासाठी बुकींग (Railway Ticket Booking) करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आयआरसीटी (IRCTC) आता रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण सेवा घेऊन येत आहे. त्यासाठी आयआरसीटीने आपल्या बुकींग नियमांमध्येही बदल केला आहे. या बदलानुसार प्रवाशांना आता ट्रेन तिकीट बुकींग करताना आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सच्या रुपात स्वत:चा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागणार आहे. भारती रेल्वेने रविवारी ही घोषणा केली आहे.
आयआरसीटीने म्हटले आह की काही रेल्वे प्रवाशी आपले रेल्वे तिकीट एजंट किंवा इतरांचे आयआरसीटी (IRCTC) अकाउंट्स वापरुन खरेदी करतात. त्यामुळे प्रवाशाचा स्वत:चा कॉन्टॅक्ट नंबर पॅसेंजर रिजर्वेशन सिस्टम (PRS) मध्ये रजीस्टर होत नाही. त्यामुळे जेव्हा एखादी अत्यावश्यक सूचना प्रवाशापर्यंत पोहोचवायची असते तेव्हा गोंधळ होतो. रेल्वे व्यवस्थापनाला संबंधित माहिती प्रवाशापर्यंत पोहोचवता येत नाही.
भारतीय रेल्वे(Indian Railways) ने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, सर्व रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकींग करताना केवळ स्वत:चा फोन क्रमंकच नोंदणी करायचा आहे. असे केल्याने जेव्हा एखादी ट्रेन रद्द झाली तर त्याची तत्काळ माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचू शकेन. त्यामुळे प्रवाशांनी जर आपला स्वत:चा फोन क्रमांक दिला तर प्रवाशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रियल-टाइम पीएनआर स्टेटस आणि इतर सेवा यांबाबत अद्ययावत माहिती घेऊ शकतात. (हेही वाचा, Bags On Wheels Service: घरापासून ट्रेनपर्यंत प्रवाशांच सामान पोहचवणार रेल्वे; जाणून घ्या काय आहे, रेल्वेची नवीन 'बॅग्स ऑन व्हील्स' सेवा)
मोबाईल नोंदणी करुन रेल्वे बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रथम 9881193322 फोन नंबर आपल्या संपर्क क्रमांकात समाविष्ठ करा. आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप सुरु करा. त्यावर 9881193322 नंबर शोधा. चॅट बॉक्समध्ये पीएनआर (PNR) नंबर मेसेज करा. व्हेरिफिकेशनसाठी विचारण्यात आलेली माहितीबाबत तपशील द्या. आता आपल्याला आपल्या प्रवासाबाबतचे अपडेट मिळतील.