Eid Ul Fitr Representative Image (Photo Credits: PTI)

मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा सण 'रमजान ईद' (Ramzan Eid) आज संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे देशभरातील तमाम मुस्लिम बांधव अगदी घरच्या घरी साधेपणाने हा सण साजरा करत आहे. लॉकडाऊन मध्ये नियमांचे उल्लंघन करत मुस्लिम बांधव हा सण साजरा करत आहे. या सणाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून देशभरातही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईद उल फित्र हा उत्साह आज दिवसभर पाहायला मिळेल.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदा दरवर्षी प्रमाणे हा उत्सव इतका भव्य होणार नसला तरीही आपल्या कुटूंबाला संदेश देण्यासाठी तुम्ही तुमच्या शुभेच्छा, प्रतिमा आणि अभिवादन पाठवू शकता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घरच्या घरी नमाज अदा करून ईद साजरी करा असे आवाहन मुस्लिम बांधवांना केले आहे. केंद्रीय मंत्री यांनी देखील आज घरच्या घरी नमाज अदा करून ईद साजरी केली. Ramzan Eid Special Recipes: रमजान ईद निमित्त घरी बनवा शीर कुर्मा, बिर्याणी सारख्या आणखी काही लज्जतदार रेसिपीज, Watch Video

या सणावर लॉकडाऊनचे जरी सावट असले तरीही मुस्लिम बांधवांचा उत्साह कायम आहे. त्यामुळे घरात आपल्या कुटूंबांसह हा सण आज साजरा केला जाईल. यासाठी आज या प्रत्येकाच्या घरात छान जेवणाचे बेत बनतील. त्याची तयारी एव्हाना सुरुही झाली असेल.

ईदच्या दिवशी जगभर आनंदाचे वातावरण असते आणि आपण एसएमएस, फोटो मेसेज आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा शेअर करू शकता. ईद अल-फित्र 2020 च्या निमित्ताने आज तुम्ही मुस्लिम बांधवांना हॉट्सअ‍ॅप, फेसबुक स्टेटस, इन्स्टाग्राम पोस्ट, स्नॅपचॅट स्टोरीज, हाईक मेसेजेस आणि टेलिग्राम मेसेंजरच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकतात.