भारत सरकार ने Dr Reddy's च्या Sputnik Light COVID-19 Vaccine ला  Phase 3 Trials साठी नाकारली परवानगी
Sputnik V | Image used for Representational purpose only | File Image

भारत सरकार कडून आज Subject Expert Committee ने डॉ रेड्डीजच्या Sputnik Light COVID-19 Vaccine च्या Phase 3 Trials ला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. ANI ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या स्फुटनिक वी लाईट लसीला भारतामध्ये तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या घेता येणार नाहीत.

दरम्यान रशिया कडून स्फुटनिक वी ही जगात कोविड 19 प्रतिबंधात्मक पहिली लस बाजारात आली होती. आता ती महाराष्ट्रातही कानाकोपर्‍यात पोहचत आहे. त्यांच्याकडूनच Sputnik Light COVID-19 Vaccine देखील बनवण्यात आली आहे. या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा असल्याने या लसीकडून अनेकांना अपेक्षा होती. पण सध्या भारतामध्ये या लसीच्या Phase 3 Trials थांबवल्या आहेत. (नक्की वाचा: रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस Coronavirus च्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक- RDIF).

रशियाचे आरोग्य मंत्रालय, Gamaleya National Research Centre of Epidemiology and Microbiology आणि Russian Direct Investment Fund (RDIF)यांच्या प्रयत्नामधून स्फुटनिक लाईटची निर्मिति करण्यात आली आहे.

RDIF कडून देण्यात आलेल्या माहिती या Sputnik Light लसीचा प्रभाव 78.6 ते 83.7% इतका आहे. वयोवृद्धांवरही ही लस प्रभावी असल्याचं समोर आले आहे. 60-79 वयोगटातील एकूण 40 हजार तर सार्‍या वयोगटातील मिळून 1,86,000 लोकांना ही लस देण्यात आली आहे. या लसीनंतर 21 ते 40 व्या दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण 0.446 % असल्याचं समोर आले आहे. तर लस न दिलेल्यामध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण 2.74% असल्याचं समोर आले आहे.