Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील 24 आणि 25 फेब्रुवारी या दोन्ही दिवसांचे संपूर्ण शेड्युल जाणून घ्या
Donald Trump | (Photo Credits: donaldjtrump.com)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) , उद्या 24 फेब्रुवारीला पत्नी मेलानिया (Melenia Trump) तसेच त्यांची मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर आणि व्हाईट हाऊस (White House)  चे दोन मुख्य सल्लागार यांच्यासह भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याने त्यांचे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्याकडून ट्रम्प यांच्या स्वागतापासून कार्यक्रमापर्यंत संपूर्ण तयारी अगदी जोरदार पद्धतीने केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यातले काही अधिकारी अगोदर भारतात दाखल  होण्याची शक्यता आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या उद्याच्या दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये आग्रा येथे ताजमहाल पाहण्यापासून ते अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे (Sardar Vallabhbhai Patel Stadium) उदघाटन करण्यापर्यंत विविध गोष्टींचा समावेश असेल. तर परवा म्हणजेच 25 फेब्रुवारी ला ट्रम्प आणि मेलेनीया हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)  यांची भेट घेणार आहेत, Donald Trump India Visit Menu: डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी 'बुखारा' रेस्टॉरंट मध्ये साकारण्यात येतंय खास 'Trump Platter'

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपूर्ण दौऱ्याचे शेड्युल जाणून घ्या..

डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी कार्यक्रम

1- डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्या सोयाबीत उद्या दुपारी 12 वाजता अहमदाबाबाद येथील विमानतळावर उतरतील. यावेळी पंतप्रधान नरेंडनर मोदी हे स्वतः त्यांचे स्वागत करणार आहेत.

2- सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून ते साबरमती आश्रम पर्यंत मोदी आणि ट्रम्प यांचा एक रोड शो आयोजित करण्यात आला आहे. 12.30  वाजता साबरमती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून पुढच्या दौऱ्यासाठी ट्रम्प जाणार आहेत.

3- साबरमती आश्रमाच्या नंतर ट्रम्प हे थेट अहमदाबाबद मधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम कडे रवाना होतील. या वास्तूचे ट्रम्प यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यानंतर नमस्ते ट्रम्प या सांस्कृतिक कार्यक्रमात ते जनतेशी संवाद साधणार आहे.

4- नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या नंतर मोदी ट्रम्प कुटुंबासोबत खास लंच चा आस्वाद घेणार आहेत.

5- साधारण 3. 30  वाजता डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलेनिया हे आग्रा येथे जाण्यासाठी रवाना होणार आहे.

6- साधारण 5 वाजता आग्रा येथे ट्रम्प कुटुंब ताज महालाची सफर करतील. याठिकाणी साधारण 45 मिनिटे घालवल्यानंतर हे दोघेही दिल्लीसाठी रवाना होतील.

डोनाल्ड ट्रम्प 25 फेब्रुवारी कार्यक्रम

1- साधारण 10 वाजताच्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प हे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी  सविता कोविंद यांची भेट घेतील.

2- 10 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ट्रम्प आणि मेलेनिया हे राज घाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पोहचतील.

3- 11.30 च्या सुमारास ट्रम्प कुटुंब हे हैदराबाद हाऊस येथे येऊन पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतील यामध्ये व्यापार विषयक तसेच दोन्ही राष्ट्रातील अंतर्गत संबंधांविषयी चर्चा होऊ शकते. याच वेळी मेलेलनीय ट्रम्प या दिल्ली येथील नानाकपुरा सरकारी शाळेला भेट देतील.

4- यांनतर भारतातील अमेरिकन राजदूत भवनात दुपारी 3 वाजता  देशातील मोठ्या व्यापाऱ्यांसोबत चर्चासत्र पार पडेल.

5- रात्री आठ वाजता  डोनाल्ड  ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कुटुंबासोबत डिनर करतील.

6- रात्री 10 वाजता ट्रम्प कुटुंब आणि अमेरिकन अधिकारी दिल्ली येथून पुन्हा विमानात बसतील.

दरम्यान,  डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारकडून महत्वपूर्ण प्लॅनिंग केले जात आहे. ट्रम्प  ज्या रस्त्यांवरून प्रवास करणार आहेत, त्या रस्त्यांवर अमेरिकन सॅटेलाईटद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण रस्त्याची सॅटेलाईट स्क्रीनिंगही केली जाणार आहे.ट्रम्प कुटुंब भारतात आल्यानंतर प्रत्येक क्षणाला 5 टिअर सुरक्षेत असणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.