पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प (Melenia Trump) यांच्या सोबत अहमदाबादेत (Ahemdabad) एक खास लंच करणार आहेत. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांना भारतातील शाकाहारी जेवणाचा अनोखा आणि लज्जतदार अनुभव मिळावा यासाठी जोरदार तयारी सुद्धा काही दिवसांपासून सुरु आहे. या स्पेशल कामासाठी सरकारकडून शेफ सुरेश खन्ना यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या कल्पनेतून एक खास ट्रम्प प्लॅटर उद्या सर्व्ह केले जाणार आहे.खन्ना यांनी ANI या वृत्त संस्थेशी संवाद साधताना ट्रम्प यांना उद्या सर्व्ह केल्या जाणाऱ्या मेन्यूची थोडक्यात माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, उद्या साधारण 12 च्या सुमारास ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प हे अहमदाबाद विमानतळावर उतरतील त्यांनतर नमस्ते ट्रम्प (Namaste Trump) या कार्यक्रमाला हजेरी लावून मग ते दिल्लीत हा लंच करणार आहेत.
गुजरात: डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वीचं 'मोटेरा स्टेडियम' बाहेरील प्रवेशद्वार कोसळले
शेफ सुरेश खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांना शुद्ध शाकाहारी गुजराती पदार्थ सुरुवातीला सर्व्ह केले जातील यामध्ये खमण, आल्याचा चहा, ब्रोकोली आणि मक्याचे सामोसे, आईस टी, ग्रीन टी,आणि मालती ग्रेन कुकीजने त्यांचे स्वागत करण्यात येईल, ट्रम्प दाम्पत्याला खमण हा पदार्थ चाखायचा असल्याने त्यात वेगळे ट्विस्ट देण्यात येणार असल्याचे खन्ना यांनी सांगितले. तर ट्रम्प प्लॅटर मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवडणाऱ्या सर्व फ्लेव्हर्सना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हॉटेलने या प्लॅटर मध्ये नेमके काय असणार हे अजूनही सांगितलेले नाही मात्र यात काही अस्सल भारतीय आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा समावेश असू शकतो, त्यात मांसाहारी पदार्थ सुद्धा असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या बुखारा रेस्टॉरंट मध्ये ट्रम्प दांपत्यासाठी जेवणाचे आयोजन केले आहे त्याठिकाणी यापूर्वी बाराक ओबामा, बिल क्लिंटन यांनी सुद्धा खास भेट दिली आहे, ओबामा यांच्या भारत दौऱ्यावेळी बुखारा मध्ये खास ओबामा प्लॅटर तर क्लिंटन यांच्या दौऱ्यावेळी क्लिंटन प्लॅटर साकारण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचा हा भारत दौरा अविस्मरणीय करणार असल्याचे सांगितल्याने यामध्ये नेमके काय काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.