मोटेरा स्टेडियम (PC - Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) येत्या 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचे (Motera Stadium) उद्धघाटन होणार आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनापूर्वीचं मोटेरा स्टेडियमच्या बाहेरील तात्पुरते उभारण्यात आलेले प्रवेशद्वार कोसळले (Gate Collapses) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे याच प्रवेशद्वारातून मोटेरा स्टेडियममध्ये जाणार होते. त्याअगोदर हे प्रवेशद्वार अचानक कोसळल आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी अधिकारी अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी ट्रम्प आणि मोदी मोटेरा स्टेडिअमच्या बाहेर उभ्या केलेल्या तात्पुरत्या गेटमधून आत जाणार होते. मात्र, हे प्रवेशद्वार जोराच्या वाऱ्यामुळे कोसळले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. (हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात)

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 100 कोटींचा खर्च केला आहे. ट्रम्प कुटुंब भारतात आल्यानंतर प्रत्येक क्षणाला 5 टिअर सुरक्षेत असणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आग्रा विमानतळावरुन ताजमहलपर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष हेलिकॉप्टर 'मॅरीन वन' तैनात करण्यात आले आहे. 36 तासांच्या भारत दौऱ्यासावर ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.