डोनाल्ड ट्रम्प यांचा 'बाहुबली' भूमिकेतील 'हा' व्हिडिओ पाहिलात का? Watch Video
Donald Trump Morphed 'Baahubali' Video (PC - Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्पदेखील भारत दौऱ्यासाठी उत्सुक असल्याचं काही घटनांवरून दिसून येतयं. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून बाहुबली (Baahubali) चित्रपटातील मीम व्हिडिओ रिट्विट केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांना भारत दौऱ्यात बाहुबलीच्या रुपात दाखवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या व्हीडिओमध्ये त्यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका आणि मुलगाही दाखविण्यात आले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना ट्रम्प यांनी 'मी भारतातील मित्रांना भेटण्यास उत्सूक आहे,' अशी कॅप्शनही दिली आहे. (हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भारत दौऱ्यावर सुरक्षेसाठी 100 कोटींचा खर्च; 25 हजार पोलिस तैनात)

या व्हिडिओमध्ये भारत आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंध दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'Solmemes1' या टि्वट हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी तो रिट्विट केला आहे. यात ट्रम्प बाहुबलीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहेत. तसेच त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प त्यांच्याबरोबर रथावर बसल्याचे दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांची मुलगी इव्हांका आणि तिचा पती जेरेड यांचेही एक दृष्य दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पेढे वाटताना दिसत आहेत.