भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit) यांनी आज आपल्या उत्तराधिकार्याचं नाव केंद्र सरकार कडे पाठवले आहे. त्यांच्याकडून धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांचं नाव सूचवण्यात आले आहे. त्यामुळे 50 वे सरन्यायधीश म्हणून चंद्रचूड म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. लळीत हे 8 नोव्हेंबर 2022 दिवशी निवृत्त होणार आहेत त्यामुळे आज त्यांनी कायदे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या विचारणेप्रमाणे चंद्रचूड यांचं नाव सूचवले आहे.
26 ऑगस्ट 2022 रोजी न्यायमूर्ती ललित यांची देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण 74 दिवसांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी धानंजय चंद्रचूड यांच्याकडे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून येणार आहे. त्यामुळे पुन्हा लळीत यांच्यापाठोपाठ एक मराठमोळा चेहरा देशाच्या सरन्यायाधीश पदासारखी मोठी जबाबदारी स्वीकारणार आहे.
Chief Justice of India UU Lalit recommends the name of Justice DY Chandrachud (in file pic) as his successor.
Justice Chandrachud to become the 50th CJI. Chief Justice UU Lalit is retiring on November 8 this year. pic.twitter.com/p0OymLfp0n
— ANI (@ANI) October 11, 2022
जाणून घ्या धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल !
धनंजय चंद्रचूड यांच्या घरात वकिलीचा वारसा आहे. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनीही भारताच्या सरन्यायाधीश पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
धनंजय चंद्रचूड यांचे शिक्षण मुंबई मध्ये कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले आहे. तर कायद्याचे शिक्षण त्यांनी दिल्ली विद्यापीठातून घेतले आहे. सोबतच अमेरिकेच्या हावर्ड युनिव्हर्सिटी मधून एलएलएम केले आहे. ज्युरिडिकल सायन्स मध्ये त्यांनी डॉक्टरेट केली आहे.
29 मार्च 2000 साली धनंजय चंद्रचूड मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा 31 ऑक्टोबर 2013 रोजी शपथविधी झाला. 13 मे 2016 दिवशी चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.
धनंजय चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाल पुढे दोन वर्ष असणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 दिवशी ते निवृत्त होणार आहेत.