P Chidambaram | File Image | (Photo Credits: PTI)

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांना घराच्या भिंतीवरुन चढून त्यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांसह 28 सीबीआय अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या वर्षात आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना अटक करण्यात आले होते. त्यावेळी डिप्युटी एसपी रामास्वामी पार्थसारथी यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले आहे. पार्थसारथी यांनीच चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांना सुद्धा अटक केली होती.

अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, सीबीआयचे संयुक्त निर्देशक धीरेंद्र शंकर शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक देण्यात आले आहे. तसेच बिनय कुमार, मनोज वर्मा, निर्भय कुमार, रवि नारायण त्रिपाठी, मुकेश वर्मा, बरुण कुमार, नारायण चंद्र साहू, नंद किशोर, नूर अली शेख आणि रोहिताश कुमार धिनवा यांना सुद्धा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे.(पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम)

तसेच गुरमीत राम रहिम यांच्या अनुयायांशी संबंधित असलेल्या प्रकरणी सुद्धा धीरेंद्र शर्मा यांनी तपास केला होता. एवढेच नव्हे तर पत्रकार जे डे हत्यााकंड प्रकरणी सुद्धा यशस्वी तपास आणि संयु्क्त अरब अमीरात येथीीन भारतीय नागरिक रोशन अंसारी याला भारतात आणणऱ्या टीमचे सुद्धा नेतृत्व केले होते.