'बिग बॉस 13' हा बहुचर्चित रिऍलिटी शो आपल्या यंदाच्या संकल्पनेवरून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, शोच्या माध्यमातून लव्ह जिहाद सारख्यागोष्टींना पाठिंबा मिळत असून हिंदू संस्कृतीचे खंडन होत आहे असे अनेक आरोप मागील काही दिवसात सतत समोर येत होते. यावरूनच करणी सेनेने (Karni Sena) सुद्धा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांना पत्र लिहीत स्पष्टीकरण मागितले होते, सोबतच या शो ला तातडीने बंद करण्याची मागणी सुद्धा होत होती, या सर्व प्रश्नांवर आता प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली आहे. सर्वांच्या मागण्या लक्षात घेत या बिग बॉस 13 बद्दलचा अहवाल मागवण्यात आला आहे, हा अहवाल प्राप्त होताच त्यावर पुढे निर्णय घेण्यात येईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
प्राप्त माहितीनुसार, यंदा बिग बॉस मध्ये स्पर्धकांनी घरात एंट्री केली त्याच दिवशी शो चा होस्ट सलमान खान याने सर्वाना आपला BFF (बेड फ्रेंड फॉरेव्हर) निवडण्यास सांगितले होते, यानुसार एका बेड वर दोघांना झोपण्याची परवानगी होती. मात्र यामुळे काश्मीरमधील मुलाबरोबर हिंदू मुली बेड शेअर करीत आहे. हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात आहे. यातून असा निष्कर्ष निघतो की हिंदू मुली लग्नाच्या आधी आई बनू शकतात. अशा प्रकारे कलर्स वाहिनी आणि सलमान खान हिंदू संस्कृतीच्या चिंधड्या उडवत आहेत, असे म्हणत राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने आरोप केले होते.
ANI ट्विट
Union Minister of Information & Broadcasting Prakash Javadekar on being asked if there is any order to ban TV show Big Boss: I have asked Ministry officials for a report on what is being shown (on the Big Boss show). We will be getting the report this week. pic.twitter.com/lUueJ0PiMg
— ANI (@ANI) October 12, 2019
दरम्यान, केंद्र सरकारने बिग बॉस बंद करा किंवा अन्य समान आशयाचे कोणतेही निर्णय अद्याप दिलेले नाहीत. याबाबत पूर्ण तपास करून मगच निर्णय घेण्यात येईल असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.