Representational Image (File Photo)

दिल्लीच्या (Delhi)  वजिराबादमध्ये (Wazirabad) नववी मध्ये शिकणार्‍या 16 वर्षीय मुलाचं अपहरण आणि त्यानंतर हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्याच तीन मित्रांनी 10 लाख रूपयांसाठी ही हत्या केली आहे. सध्या आरोपी अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात आहेत. रविवारी या मुलांनी मित्राचे अपहरण केले होते.

आरोपींनी मुलाला भालस्वा तलावाजवळील एका निर्जन भागात नेले. जिथे त्याच्यावर अनेक चाकूने वार केले. आरोपीने कुटुंबाकडून 10लाख रुपयांची खंडणीही मागितली. कुटुंबाला नंतर मृतदेह सापडला असे PTI ने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले.

दिल्लीतील या घटनेबद्दल बोलताना मृताच्या आईने पत्रकारांना सांगितले की, "रविवारी संध्याकाळी माझा मुलगा बाहेर गेला होता आणि एक फोन आला. त्याने सांगितले की तो 10 मिनिटांत परत येईल, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. नंतर आम्हाला 10 लाख रुपयांची खंडणी मागणारा फोन आला, पैसे दिले नाहीत तर मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली." Delhi: दोन अल्पवयीन युवकांनी केली 24 वर्षीय तरुणाची हत्या, वारंवार इशारा देऊनही पीडितेने आरोपीच्या एका बहिणीशी साधत होता संवाद .

मृत  मुलाच्या आईची प्रतिक्रिया

सोमवारी पोलिसांना मुखर्जी नगरमध्ये शिकणाऱ्या बेपत्ता मुलाबद्दल फोन आला. "तपासादरम्यान पोलिसांना बेपत्ता/अपहरण झालेला मुलगा शेवटचा तीन मुलांसोबत Jharoda Pushta road वर मोटारसायकलवर दिसला होता," असे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भात तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. या मुलांनी चौकशीदरम्यान गुन्हा कबूल केला आहे. अल्पवयीन मुलांनी सांगितले की ते त्याला मोटारसायकलवरून जंगलात घेऊन गेले होते, जिथे त्यांनी त्याचा चाकूने वार करून खून केला आणि तेथून पळून गेले. त्यानंतर एका दिवसाने, त्यांनी ठार मारलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. हा कॉल त्या मुलाच्या सिम कार्डवरून करण्यात आला होता.

"अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांच्या सांगण्यावरून पोलिस पथकाला त्याचा मृतदेह सापडला," असे पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त आहे. पीटीआय च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेच्या शरीराचे तुकडे करण्याचाही प्रयत्न केला.