
दिल्ली (Delhi) येथून जवळजवळ 60 किमी दूर असलेल्या पलवल मध्ये एका मैत्रिणीने आपल्या रिलेशनशिप बद्दल कोणाला कळू नये म्हणून एक धक्कादायक कृत्य केले आहे. तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळूनच ज्या मैत्रिणीला तिच्या लव्ह अफेअर बद्दल माहिती होते तिची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणीला अटक केली असून पळ काढलेल्या तरुणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.(बिहार: बायकोच्या विवाहबाह्य संबंधात नवरा ठरला अडथळा, नाकात-कानात फेविक्विक टाकत अत्यंत क्रूरपणे केली हत्या)
तरुणीला भीती होती की तिची मैत्रिण तिच्या अफेअर बद्दल घरी सांगेल. याच कारणास्तव तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिला मृत्यूच्या दारात नेऊन उभे ठेवले. मैत्रिणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह आगरा कॅनाल जवळील झाडाझुडपांमध्ये फेकून तेथून पळ काढला. सध्या पोलिसांनी आरोपींच्या विरोधात हत्या आणि अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी तरुणीला ही ताब्यात घेण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृत तरुणीला माहिती सुद्धा नव्हते तिची मैत्रिणीच तिची हत्या करु शकते.(Hyderabad Shocker: अभ्यासाकडे लक्ष देत नसल्याने वडिलांनी 10 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक, आरोपी फरार)
आरोपी तरुणीने प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यांनी तक्रारीत असे म्हटले की, त्यांची मुलगी बीएसईच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारात ती तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला गेली होती. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत प्रियकराचा शोध घेतला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.