
बिहार (Bihar) मधील गया मधील एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याची बाब नवऱ्याला कळताच त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. बायकोने आपल्या परिवारासह नातेवाईकासोबत मिळून हे कृत्य केले आहे. असे सांगितले जात आहे की, बायकोने आपल्या नातेवाईकांसोबत मिळून नवऱ्याला मारहाण सुद्धा केली. ऐवढेच नाही तर डोळे, नाक आणि कानात फेविक्विक टाकल्यानंतर त्याच्यावर चाकूने वार सुद्धा केले.(मेरठ: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली सावत्र आईची हत्या)
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने असे म्हटले की, सलेमपुर येथील मुन्ना गुप्ता नावाच्या व्यक्तीची बायको जुली हिचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. हिच गोष्ट मुन्ना याला कळली. असे सांगितले जात आहे की, मुन्ना याने जुलीला आपल्या पार्टनर सोबत विचित्र अवस्थेत पाहिले. तेव्हापासूनच मुन्ना आणि जुली यांच्यामध्ये जोरदार वाद होण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारी या दोघांमध्ये पुन्हा एकदा याच कारणावरुन भांडण झाले. आरोप असा आहे की, आई, वडील आणि अन्य लोकांच्या सोबत मिळून जुली हिने आपल्या नवऱ्याला मारहाण केली.
ऐवढेच नाही तर आरोपीने नवरा बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या नाकात, कानात फेविक्विक सुद्धा टाकले. असे करुन सुद्धा त्यांचे मन न भरल्याने त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. गयाचे एसएसपी आदित्य कुमार यांनी शनिवारी असे म्हटले की, शुक्रवारी रात्री एका पोत्यात भरला. नवऱ्याचा मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोलच्या शोधात रात्री बाईकवरुन निघाले. तेव्हाच पोलिसांचे लक्ष या प्रकारावर गेले आणि खुलासा झाला.(Kerala: धक्कादायक! केरळमधील मलप्पुरम भागातील 17 वर्षीय मुलीचा 38 जणांकडून लैंगिक अत्याचार; 20 जणांना अटक)
पोलिसांना पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला. पण पोलिसांनी बाइकची ओळख पटवत तपास करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आरोपी जुली, मृत नवऱ्याचे सासरे, सासू यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.