Oxygen Cylinder (Photo Credits: (Wikimedia Commons)

भारतात कोरोनाच्या रुग्णांचा झपाट्याने वाढ होत आहे.अशातच देशात ऑक्सिजन, लस, बेड्स यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीत सुद्धा हिच परिस्थिती आहे. त्यामुळे दिल्ली हायकोर्टात ऑक्सिजन संदर्भात सुनावणी केली जात आहे. सुनावणी दरम्यान दिल्ली सरकारने असे म्हटले की, राजधानीमध्ये बेड्सची संख्या 150000 पर्यंत वाढवली जात आहे. आम्ही 15 हजार अतिरिक्त बेड्स उपलब्ध करुन देत आहोत. परंतु आमच्याकडे या बेड्ससाठी ऑक्सिजन नाही आहे.(Gujarat Fire in COVID-19 Care Centre: गुजरातच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 14 कोरोना रुग्णांसह 2 स्टाफ नर्सचा मृत्यू)

यावर दिल्ली हायकोर्टाने प्रश्न उपस्थितीत केले आहे की, सरकारने आतापर्यंत आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या मदतासाठी विनंती का नाही केली. सुनावणी दरम्यान दिल्लीच्या बत्रा रुग्णालयाने हायकोर्टाला असे सांगितले की, आमच्याकडे फक्त एक तासांपूर्ताच ऑक्सिजन आहे. अधिवक्ता विराट गुप्ता यांनी अपील मध्ये असे म्हटले की, त्यांना माहिती आहे 12 राजकीय पक्ष ऑक्सिजनचा काळाबाजार करण्याच्या पाठी लागले आहेत.

बत्रा रुग्णालयाने हायकोर्टाला म्हटले की, आम्ही दररोज काही तास संकटात घालवत आहोत. हे चक्र संपतच नाही आहे. यामुद्द्यावर दिल्ली सरकारने कोर्टाला म्हटले की, दिल्लीतील ऑक्सिजन टँकर्सला प्राथिमकता दिली जात नाही आहे. दिल्ली नेहमीच रोज संघर्ष करत आहे. रुग्णालयाने कोर्टाला सांगितले की, एक WhatsApp ग्रुप सुद्धा तयार केला असून तेथे ऑक्सिजन संबंधित विचारणा केली तेव्हा त्यांना आम्हाला डिस्टर्ब करु नये असा रिप्लाय आल्याचे त्यांनी म्हटले.

यावर दिल्ली कोर्टाने बत्रा रुग्णालयाच्या MD यांना असे म्हटले की, तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे. तुमच्यासाठी राग येणे ही गोष्ट योग्य नाही. तुम्ही डॉक्टर्स आहात. जर तुम्ही  कंट्रोल हरवून बसलात तर बाकी लोकांचे काय होणार. सर्व लोक सप्लाय चैनच्या उत्तम कामपाठी लागले आहेत. दिल्ली हायकोर्टाने सरकारला निर्देशन दिले आहेत की त्यांनी तातडीने रुग्णालयाची मदत करावी.(Serum Institute कडून देशाबाहेर लसीचे उत्पादन करण्याचा विचार- रिपोर्ट्स)

बत्रा रुग्णालयाने कोर्टाला सांगितले की, आठ रुग्णांचा ऑक्सिजन नसल्याने मृत्यू झाला आहे. त्यात एका डॉक्टरचा सुद्धा समावेश आहे. आम्ही ऑक्सिजन शिवायत एक तास ऑपरेशन चालवले आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळाला आहे. आम्हाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही आणि 12 ऑक्सिजन संपले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने आणखी एक आपत्कालीन SOS जाहीर केले आहे. दिल्लीच्या बत्रा रुग्णालयाने म्हटले की आमच्याकडे दहा मिनिटात ऑक्सिजन संपणार आहे. आमच्याकडे 326 रुग्ण भरती आहेत.