दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Elections 2020) प्रचारसत्र दिवसागणिक अधिक तापत असताना भाजप (BJP) कडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. अलीकडेच भाजप खासदार प्रवेश वर्मा (Pravesh Sharma) यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. ज्यावर अनेकांनी टीका केल्या मात्र आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा केल्याने हा वाद आणखीनच चिडला गेला आहे. प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे. केजरीवाल भाबडा चेहरा करून 'मी दहशतवादी आहे का?' असा सवाल विचारत आहेत. त्याचे उत्तर होय असे आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे जाहीर विधान केजरीवाल यांनी केलेले असून अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, अशा शब्दांत जावडेकर यांनी केजरीवाल यांना निशाणा केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या विधानावर आम आदमी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचाही इशारा पक्षाकडून देण्यात आलेला आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीतून दिल्लीत भाजप विरुद्ध आप असा वाद पेटलेला दिसून येत आहे. Delhi Assembly Election 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान; भाजप खासदार अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई
ANI ट्वीट
#WATCH Union Minister Prakash Javadekar in Delhi: Kejriwal is making an innocent face & asking if he is a terrorist, you are a terrorist, there is plenty of proof for it. You yourself had said you are an anarchist, there is not much difference between an anarchist & a terrorist. pic.twitter.com/vRjkvFKGEO
— ANI (@ANI) February 3, 2020
यापूर्वी, भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनीही अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. एका जाहीर सभेत , केजरीवालांसारखे नटवरलाल, केजरीवालांसारखे दहशतवादी देशात लपलेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवालांसारख्या दहशतवाद्यांशी लढावे, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे वर्मा म्हणाले होते. यावर उत्तर देताना "मी तुम्हाला मुलासमान वाटत असेन तर झाडू या निशाणीला मतदान करा आणि मी दहशतवादी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमळापुढील बटण दाबा, असे केजरीवाल म्हणाले होते.