ऑनलाईन खरेदीसाठी डेबिट, क्रेडिट कार्ड संबंधित 'हे' काम येत्या 16 मार्च पूर्वी करा
ATM/ Debit Cards (Photo Credits: Pixabay)

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी डेबिट (Debit) किंवा क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 16 मार्चपासून आरबीआयचे काही नियम  लागू होणार असून त्यानुसार तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करुन  ऑनलाईन पद्धतीने व्यवहार कर शकत नाहीत. 15 जानेवारीला जाहीर करण्यात आलेल्या एका नोटीसनुसार, आरबीआयने क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संबंधित सुरक्षा आणि सुविधा वाढवण्यासाठी काही उपायांची घोषणा केली होती. आरबीआयने बँकांना असे सांगितले होते की, एखाद्या ग्राहकाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्यामध्ये फक्त राज्यातील एटीएम आणि PoS Terminals संबंधित व्यवहार करण्याची सुविधा असणे अनिवार्य आहे.

आरबीआयने नवे नियम जाहीर करण्यात येणाऱ्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी 16 मार्च 2020 पासून लागू होणार आहे. ज्या व्यक्तींकडे आधीपासूनच कार्ड असून त्यांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणारआहे. त्यानुसार ग्राहकांना त्यांचे कार्ड ऑनलाईन, इंटरनशनल किंवा कॉन्टेक्सलेस ट्रान्झेक्शनसाठी वापर केला नसल्यास त्यांना अनिवार्य रुपाने त्या उद्देशांसाठी डिसेबल केले जाणार आहे. ग्राहकांना 24X7 क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन व्यवहाराची सीमा ठरवू शकणार आहेत.(7th Pay Commission: होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; घरभाडे भत्ता झाला दुप्पट, पगारही वाढला)

कार्ड देणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्था ग्राहकांना ही सुविधा प्रदान करतील ज्याद्वारे ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, पीओएस, एटीएम, ऑनलाईन व्यवहार किंवा संपर्कविरहित व्यवहारासाठी मर्यादा किंवा बदलू शकतात. दरम्यान, प्रीपेड गिफ्ट कार्ड्ससाठी 16 मार्च रोजी लागू हे आरबीआय नियम अनिवार्य नाहीत. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरबीआयचे हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे.