
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई मदत (Dearness Relief) मध्ये 2% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) 1 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या या सुधारणेमुळे डीए मूळ वेतन/पेन्शनच्या 53% वरून 55% पर्यंत वाढेल. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी (Central Government Employees) हा एक महत्त्वपूर्ण दिलासा मानला जात आहे. ज्याचा फायदा या कर्मचाऱ्यांन आर्थिक स्वरुपामध्ये मिळणार आहे. हे कर्मचारी आठवा वेतन आयोग केव्हा लागू होतो याच्या प्रतिक्षेत असताना त्यांना ही खूशखबर मिळाली आहे.
आर्थिक परिणाम आणि लाभार्थी
- महागाई भत्ता वाढल्याने त्याचा फायदा सुमारे 48.66 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 66.55 लाख पेन्शनधारकांना होईल. अधिकृत अंदाजानुसार, वाढीव देयकामुळे तिजोरीवर दरवर्षी 6,614.04 रुपयांचा कोटींचा बोजा पडेल.
- जुलै 2024मध्ये सरकारने भत्ता 50% वरून 53% पर्यंत वाढवला होता, तेव्हा मागील डीए वाढीनंतर हे समायोजन केले आहे. हे पाऊल 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईनुसार भरपाई मिळेल याची खात्री होते. (हेही वाचा, 8th Pay Commission Salary Hike: अपेक्षित फिटमेंट फॅक्टर, अंमलबजावणीची तारीख आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल)
महागाई भत्ता (DA) म्हणजे काय?
- महागाईच्या परिणामाचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देण्यात येणारा अतिरिक्त आर्थिक लाभ म्हणजे महागाई भत्ता (DA) हा. वेतन आयोगाकडून दर दशकात मूलभूत वेतनात सुधारणा केली जात असली तरी, वाढत्या किमतींमध्ये कर्मचाऱ्यांची खरेदी शक्ती टिकवून ठेवण्यासाठी डीए वेळोवेळी समायोजित केला जातो. (हेही वाचा, 8th Pay Commission: सलग तीन वेतन आयोग, महागाई भत्ता आणि त्याचे सूत्र घ्या जाणून)
- येत्या काही वर्षांत लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या आधी महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थिरता राखण्यात नियमित महागाई भत्त्यात वाढ महत्त्वाची भूमिका बजावते असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढ दिली असली तरी, या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारनेही आठवा वेतन आयोग गठीत करण्यास मान्यता दिली असली तरी, अद्याप तरी तो गठीत करण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता कायम आहे. आठवा वेतन आयोग गठीत झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीत मोठाच बदल होण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पगार हजारात आहे ते काही लाखांमध्ये जाऊ शकतात, असे अभ्यासक सांगतात. दरम्यान, ते नेमके किती वाढणार याबाबत प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे हे निश्चित. त्यामुळे तूर्तास तरी या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या महागाई भत्ता वाढीचाच आनंद घ्यावा लागणार आहे.