SII, Bharat Biotech च्या कोविड 19 लसींना  मंजुरी ही कोविड मुक्त भारताचं निर्णायक वळण म्हणत PM Narendra Modi यांनी केलं कोविड योद्धांचं अभिनंदन!
File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

भारतामध्ये आज (3 जानेवारी) कोविड 19 लसीला मान्यता देऊन अखेरीस लसीकरणाला सुरूवात करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. , Serum Institute of India च्या Covishield आणि Bharat Biotech च्या COVAXIN ला DCGI ची मंजुरी मिळाल्यानंतर देशाचे पंताप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत या लसीला मान्यता म्हणजे देशाची कोविड फ्री दिशेने अधिक प्रगती होणार असल्याचं म्हटलं आहे. सोबतच या दोन्ही लसी भारतीय बनावटीच्या असल्याने त्याबद्दलचा विशेष आनंद व्यक्त केला आहे. COVID-19 Vaccine: भारतामध्ये Covishield, COVAXIN ला Emergency Use साठी DCGI ची मंजुरी.

भारतामध्ये कोविड 19 लसीला मिळणारी मंजुरी ही आपल्या कोविड 19 विरुद्धच्या लढ्यातील आपली शक्ती अधिक बळकट करणारी आहे सोबतच हा टर्निंग पॉंईंट आहे. या लसीच्या निर्मितीमध्ये सहभागी शास्त्रज्ञ, संशोधक आणि लस उत्पादक कंपन्यांचेही आभार असे त्यांनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi Tweet

आज डीसीजीआय ने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी संपूर्ण पणे सुरक्षित असल्याचं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. सोमाणी यांनी म्हटलं आहे. लस 100% पेक्षा अधिक सुरक्षित आहे. सहाजिकच त्याचे इतर लसीच्या वेळेस जसे दुष्परिणाम दिसले तसे दिसू शकतात. यामध्ये सौम्य ताप, डोकेदुखी असे परिणाम आहेत पण त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचंही म्हटलं आहे.