गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टीवरील वायू चक्रीवादळाचा (Cyclone Vayu) धोका अद्याप टळला नाही आहे. तर शुक्रवारी पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्यासोबत निगडित असलेल्या एका उच्च अधिकाऱ्यांनी वायु चक्रीवादळ पुन्हा एकदा गुजरातमध्ये धडकणार असल्याचे म्हटले आहे. तर उद्या (16 जून) रोजी कच्छच्या (Kutch) किनारपट्टीवर वायु चक्रीवादळ घोंगावणार आहे.
तसेच वायु चक्रीवादळ आपली दिशा सुद्धा बदलू शकतो असे सुद्धा सांगण्यात आले असून 17-18 जून पर्यंत कच्छला येऊन धडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी असे सांगितले की, वायु चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू कमी होईल मात्र कमी दबाव किंवा वादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर त्याचा परिणाम होणार आहे. परंतु कोणतीही दुर्घटना घडून नये म्हणून त्यासंबंधित कार्याची तयारी केली आहे.
गुजरातच्या किनारपट्टीवर बुधवार आणि गुरुवारी वायु चक्रीवादळ धडकणार होते. मात्र त्याने आपली दिशा बदलली. तर चक्रीवादळ गिर, सोमनाथ, दीव, जूनागढ़ आणि पोरबंदर येथे धडक देत गुजरातच्या किनारपट्टीवरुन पुढे गेले. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या 700 पेक्षा अधिक गावांना तेथून हलवण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन लाखे लोकांनी किनारपट्टीच्या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात आले आहे.