Cyclone Vayu (Photo Credits: IANS)

झंझावती 'वायू' (Vayu) चक्रीवादळ आज दुपारपर्यंत गुजरातच्या द्वारका आणि वेरावल च्या मध्यस्थानी धडकेल. 'वायू' सारख्या चक्रीवादळाचे रुद्र स्वरुप लक्षात घेता सर्व सुरक्षायंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र यात थोडी दिलासादायक बातमी म्हणजे वायू चे कचाट्यात संपुर्ण गुजरात राज्य अडकणार नसून पोरबंदर, द्वारका आणि वेरावल हे भाग  वायू च्या विळख्यात अडकणार आहेत. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करता यावे म्हणून सेना, वायुसेना, एनडीआरएफ शिवाय भारतीय नौसेना चे विमान यांना तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईसह कोकणातील समुद्रकिनारेही बंद ठेवण्यात आले आहेत.

अवघ्या काही तासांत गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या काही भागांत धडकणा-या वायू चक्रीवादळासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. तसेच ह्या भयाण संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकारसोबत कामाला लागली आहे.

किनारपट्टीलगतच्या भागातील 1.5 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. तसेच त्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. या वायू चक्रीवादळाचा वेग 150 प्रति तासापेक्षासुद्धा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच हा तुफानी वादळात नागरिकांची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ ने हेल्पलाईन नंबर दिले आहेत. दीव, भावनगर, केशोद आणि कांडला एअरपोर्टवरुन सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

तसेच ताज्या बातमीनुसार रेल्वेने सांगितले आहे की , पश्चिम रेल्वे ने वायू चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 70 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

Cyclone Vayu चा परिणाम मुंबईकरांना जाणवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मात्र त्यामुळे लोकांना काही अडचणी येऊ नये म्हणून पश्चिम रेल्वे ने विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे. ह्या विशेष रेल्वेगाड्या गांधीधाम, पारा, पोरबंदर, वेरावल आणि ओखा या ठिकाणांहून चालू राहतील,जेणेकरुन लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मदत होईल.