Cyclone Vayu चा परिणाम मुंबईकरांना जाणवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

वायू चक्रीवादळ (Cyclone Vayu) हे सध्या गुजरातच्या (Gujrat) दिशेने पुढे सरकत चालले आहे. मात्र त्याचा मुंबईला (Mumbai) परिणाम जाणवणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांचा सुरक्षिततेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या पुढील काही तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे.

चक्रीवादळ हे मुंबईतील दक्षिण किनारपट्टीपासून 280 किमी अंतरावर धडकले आहे. तसेच 110-135 किमी या प्रतिवेगाने ते हळूहळू गुजरातच्या दिशेने वळले जात आहे. या वादळामुळे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच झाडाखाली उभे राहू नये असे सांगण्यात आले आहे.

(मुंबईत यंदा सुद्धा समुद्राच्या मोठ्या लाटा उसळणार, महापालिकेचे नागरिकांना आवाहन)

सध्या हवामानात बदल झाला असून त्याचा परिणाम मुंबईकरांना सुद्धा होणार आहे. तर 15 जून पासून पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबत 12-13 जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.