यंदा पावासाच्या काळात मुंबईतील (Mumbai) समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर समुद्रात तब्बल 28 वेळा मोठी भरती येणार असून 4.30 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना सुरक्षिततेच्या बाबतीत आवाहन करण्यात आले आहे. तसेच मच्छिमारांनी सुद्धा समुद्रात जाऊ नये असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून समुद्राच्या मोठ्या लाटा कधी उसळणार याबद्दल सांगण्यात आले आहे. तर येत्या 1 सप्टेंबर रोजी यंदाच्या वर्षामधील सर्वात मोठी भरती दुपापी 1.15 वाजता येणार आहे. त्याचसोबत जुलै महिन्यात 5 तारखेला 4.79 मीटर उंच लाट उसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत 3 ऑगस्टला दुपारी 1.44 मिनिटांनी समुद्रात 4.90 मीटरची लाट समुद्रात आलेली दिसून येणार आहे. तर सध्या सायक्लोन वायू आता गुजरातच्या दिशेने वळले आहे. मात्र उद्या मुंबईत धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.(अबब! कृत्रिम पावसासाठी सरकार खर्च करणार 'इतके' कोटी रुपये)
भरतीच्या वेळी असणारी लाटांची उंची आणि ओहोटीच्या वेळी असणारी लाटांची उंची या दोघांमधील फरक जेव्हा अतिशय कमी असतो अशा परिस्थितीला ‘नीप टाईड’ म्हणतात. त्यामुळे यंदा पावसाच्या काळात आठ वेळा नीप टाईड असल्याचे सांगण्यात आले आहे.