Gujarat Fire: द्वारका येथे घराला अचानक आग, अग्नितांडवात चौघांचा मृत्यू
Fire, Death प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Gujarat Fire: गुजरात राज्यातील द्वारका येथे आग लागल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. एका घराला अचानक आग लागली आहे. घराला आग लागल्याने आगीत कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्यांपैकी एका लहान बाळाचाही समावेश आहे. आग रविवारच्या पहाटे 3 वाजता लागली. जेव्हा सर्व जण निवांत झोपले होते. (हेही वाचा- वाघोलीत देशी दारूच्या दुकानात तुंबळ हाणामारी, बाटल्या फोडल्या; घटनेचा Video व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका येथील एका घराला आग लागल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. तसेच अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु झाले. आगीवर पूर्णपणे नियत्रंण मिळवण्यात आला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्यामुळे परिसरातील लोकांना आरडाओरड केला.

घराला आग लागल्यामुळे सर्वच वस्तू जळून खाक झाले. घरातील एअर कंडीशन ओव्हर हीट झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज पोलिसांना वर्तवला आहे. सुदैवाने घरातील एका आजीचा जीव वाचला आहे. आग कश्यामुळे लागली आहे याचा शोध सुरु आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे. घरातून मृतांना बाहेर काढण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.