Pune Crime: वाघोलीत देशी दारूच्या दुकानात तुंबळ हाणामारी, बाटल्या फोडल्या; घटनेचा Video व्हायरल
Pune Crime Video PC TWITTER

Pune Crime Video: पुणे शहर हे विद्येचे माहेर घर असं म्हटलं जात परंतु वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून पुण्याला गुन्हेगारीचे माहेर घर असं म्हटलं जात आहे. पुण्यात भरदिवसा देखील काय होईल काही सांगता येत नाही. दोन दिवसांपूर्वीच कोयत्याने मारमारी झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे. देशी दारूच्या दुकानात हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  (हेही वाचा- भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी, भरावा लागला 5 हजार रुपयांचा दंड

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाघोलीतील आहे. देशी दारूच्या दुकानात ३ ते ४ जणांमध्ये हाणामारी झाली. शनिवारी ही घटना वाघोतीली केसनंद रोडवरिल दुकानात ही घटना घडली. ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हाणामारीत दोघे जणांना दुखापत झाली आहे.या मारामारीत एक पीएमपीएलचा कर्मचारीही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन ते तीन जण मद्यपान करण्यासाठी बसले होते. त्यामध्ये एक पीएमपीएलचा कर्मचारी सुध्दा होता. त्यांच्या काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांचा थेट मारामारी झाल्याचे दिसून आले. या नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. लोणी कंद पोलिस या घटनेचा तपास करत आहे. कोणत्या कारणावरून वाद झाला होता हे अद्याप समोर आले नाही. त्यामुळे पोलिस या प्रकरणी चौकशी तपासणी करत आहे. घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.