एटीएम (ATM) , डेबिट (Debit Card) क्रेडिट कार्ड (Credit Card) च्या माध्यमातून होणाऱ्या फ्रॉड ना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) एक नवा नियम लागू करण्याचे जाहीर केले आहे, यानुसार येत्या 16 मार्च पर्यंत जर का तुमच्याकडील क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड एकदाही वापरलेले नसेल तर तुम्हाला ऑनलाईन आणि कॉन्टॅक्ट लेस ट्रानजॅक्शन (Contact Less Transaction) यापुढे करता येणार नाहीत. तर दुसरीकडे 16 मार्चपासून स्थानिक, आंतरराष्ट्रीय, पीओएस ट्रांजेक्शन, एटीएम ट्रांजेक्शन लिमिट ठरवण्याची सुविधा मिळणार आहे. यानुसार कार्ड होल्डर स्वत: आपलं डेबिट/क्रेडिट कार्ड सुरु ,बंद करू शकतात, त्याचे लिमिट सेट करू शकतात तसेच कार्डच्या स्टेटसमध्ये काही बदल झाल्यास लगेच ग्राहकाला अलर्ट जाणार आहे, ज्यानुसार शक्य ती ऍक्शन घेणे तात्काळ शक्य होईल. Alert: 'स्टेट बँक ऑफ इंडिया' च्या ATM मधून पैसे काढताना 1 जानेवारी पासून लागू झाला 'हा' नियम
प्राप्त माहितीनुसार, आरबीआयने नव्या नोटिफिकेशन मध्ये या सुविधांची माहिती दिली आहे, यापुढे दिवसभरातील कधीही कोणत्याही वेळी ग्राहकांना आपल्या कार्डाचे डिटेल्स बदलता येऊ शकतात तसेच आपल्या कार्डमधून जास्तीत जास्त किती रक्कम काढता येईल हे सुद्धा ठरवता येणार आहे. हे सर्व काही तुमच्या नियमित मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवरील पर्यायांमधून, बँकेच्या कस्टमर सर्व्हिस क्रमांकावर फोन करून सुद्धा लागू करू शकता.
दरम्यान, अलीकडे दर दुसऱ्या दिवशी उघड होणाऱ्या घोटाळ्यांना पाहता आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधा लागू करून घेण्यासाठी सुद्धा 16 मार्च पर्यंत तुम्ही तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड एकदा तरी वापरलेले असणे आवश्यक आहे, अन्यथा या सुविधेसहितच तुमच्या अकार्डवर सुद्धा कारवाई करून ब्लॉक किंवा बंद केले जाईल.