COVID-19 Vaccine Update: देशात Sputnik V लसीच्या वितरणाला Dr Reddy's कडून सुरुवात
Sputnik V | Image used for Representational purpose only | File Image

कोविड-19 (COVID-19) विरुद्धची रशियाची स्पुटनिक व्ही लसीचे (Sputnik-V Vaccine) उत्पादन हैद्राबाद मधील Dr Reddy's Laboratories कडे दिले होते. या लसीच्या पहिल्या डोसचे उत्पादन सुरु झाले असून Dr Reddy's सोबत पार्टनर असलेल्या देशभरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये याचे वितरण सुरु झाले आहे. या घोषणेनंतर Panacea Biotec यांनी स्पुटनिक व्ही लसीच्या second component चे पहिले वितरण सुरु असून संपूर्ण देशभरात हे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडमधून येणारा स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा Dr Reddy's याआधी स्थगित करण्यात आला होता. पहिल्या डोसच्या वितरणानंतर तितक्याच संख्येने दुसऱ्या डोसेचे component सुद्धा पुरवले जातील, अशी माहिती Dr Reddy's च्या प्रवक्तांनी दिली. (Sputnik V Vaccine: रशियाची 'स्पुतनिक व्ही' लस डेल्टा प्रकाराविरूद्ध 83 टक्के प्रभावी; रशियन आरोग्यमंत्र्यांचा दावा)

स्पुटनिक व्ही लसीच्या उपलब्धतेच्या माहितीसाठी Dr Reddy यांनी एक वेबसाईट सुरु केली असून यामध्ये शहरांची यादी, तिथे उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची यादी आणि हॉस्पिटलमधील लसीची उपलब्धता याची माहिती www.drreddys.com/sputnik-vaccine या वेबसाईटवर मिळेल.

घोषणा केल्याप्रमाणे आरडीआयएफ (RDIF) आणि Panacea Biotec यांनी लसीच्या दुसऱ्या डोसच्या component चे उत्पादन सुरु केले आहे. तर देशभरातील सर्व पार्टनर हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही च्या पहिल्या डोसचे वितरण Dr Reddy's कडून सुरु करण्यात आले आहे. लवकरच दुसऱ्या डोसचे उत्पादन सुद्धा वेगाने सुरु होईल, यामुळे Dr Reddy's कडून लसीचा पुरवठा कायम राहील. RDIF सोबत केलेल्या करारानुसार, Dr Reddy's कडून भारतात एकूण 250 मिलियन स्पुटनिक व्ही च्या कोविड-19 लसी देण्यात येतील.