Coronavirus Cases In India: भारतामध्ये आज (1 जून) रोजीपर्यंत आरोग्य खात्याने दिलेल्या अपडेटनुसार, एकूण 1,90,535 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये 8392 ने वाढ झाली आहे. यामध्ये 230 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये 93322 जणांवर उपचार सुरू असून 91819 लोकांनी कोरोनावर मात देखील केली आहे. तर देशामध्ये 5394 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असंलेल्या देशांच्या यादीत भारत 7 व्या स्थानी पोहचला आहे. भारताने या यादीत 1 लाख 88 हजार 882 रुग्ण असणाऱ्या फ्रान्सला (France) आणि 1 लाख 83 हजार 494 रुग्ण असणाऱ्या जर्मनीला (Germany) मागे टाकले आहे. तर या यादीत अजूनही अमेरिका (US) सर्वाधिक अशा 18 लाख 37 हजार 170 रुग्णांसह टॉप वर आहे. कोरोना व्हायरस संदर्भात क्षणाक्षणाचे अपडेट जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.
Worldometer तर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या या यादीत अमेरिकेच्या पाठोपाठ ब्राझील (5,14,992 रुग्ण), रशिया (4,05,843 रुग्ण) यांचा दुसरा व तिसरा क्रमांक आहे. चौथ्या स्थानी असणाऱ्या स्पेन देशात आजवर 2,86,509 कोरोनाबाधित आढळले आहेत तर 2, 74,762 कोरोना रुग्णांच्या सह इंग्लंड पाचव्या स्थानी आहे. सहाव्या स्थानी असणाऱ्या इटली मध्ये 2, 32,997 कोरोना रुग्ण आहेत. आणि यांनतर भारत, फ्रान्स रशिया यांचा क्रमांक आहे. या देशातील कोरोनाबाधितांचे मिळून सद्य घडीला जगभरात 62 लाख 66हजार 888 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, यापैकी 3 लाख 73 हजार 960 रुग्णांनी आजवर आपले प्राण गमावले आहेत.
पहा जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांची यादी

दरम्यान, भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्र्र, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात आढळून आला आहे. यानुसार देशात विविध कंटेनमेंट आणि रेड झोन्स घोषित करण्यात आले आहेत. या झोन्सला वगळून आज पासून सुरु होणाऱ्या लॉक डाऊन च्या पाचच्या टप्प्यात देशातील विविध व्यवसाय उद्योग सुरु करण्यात येणार आहेत.