Coronavirus: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोना व्हायरस संसर्ग
Gajendra Singh Shekhawat | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेखावत यांच्या जवळच्या वर्तुळातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात आयएएनएसने म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेखावत यांच्यावर गुरुग्राम येथील मोदांता रुग्णालयात उपचार केले जातील. शेकावत यांना गेल्या काही दिवसांपासून अत्यावस्त वाटत होते. त्यामुळे त्यांची कोरोना व्हायरस (COVID 19) चाचणी गुरुवारी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आली.

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गजेंद्र सिंह शेखावत यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. शेखावत यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात येईल. जेणेकरुन कोणाला कोरोना व्हायरस संसर्ग झाला असल्यास त्याचा शोध घेण्यात येईल. केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे. (हेही वाचा, भाजप नेते निलेश राणे यांना कोरोना विषाणूची लागण; तब्येत व्यवस्थित असून, क्वारंटाईन मध्ये असल्याची दिली माहिती)

दरम्यान, या आधी इतरही काही केंद्रीय मंत्र्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही कोरोना व्हायरच चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंत ते बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यावर उपचार सुरु आहेत.