पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा 'आयो दीयां जलाएं' कवितेचा खास व्हिडिओ (Watch Video)
Atal Bihari Vajpayee & Narendra Modi (Photo Credits: IANS)

भारत देशात कोरोना व्हायरसचे संकट अधिक भयंकर रुप धारण करु लागले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशवासियांनी बळ मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवा लावण्याची संकल्पना देशावासियांसमोर मांडली. यातून तुमची एकजूट दिसून येईल अशी यामागे त्यांची धारणा आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत. या आवाहनानंतर अनेकांनी मोदींवर टीका केली आहे. तसंच त्यावर अनेक मीम्सही बनवले जात आहेत. मात्र या सर्व प्रकारावर पंतप्रधान मोदींनी अगदी सहज सुंदर प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी आज भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'आओ दीया जलाएं' असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडिओत अटल बिहारी वाजपेयी 'आओ दीया जलाएं' ही कविता सादर करत आहेत. या कवितेतून दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. मोदींनी हा व्हिडिओ शेअर करत टीकाकारांना शांतपणे उत्तर दिले असून देशावासियांना 5 एप्रिल रोजी दिवा लावण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. (5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा, कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन)

नरेंद्र मोदी ट्विट:

 

यापूर्वी जनता कर्फ्यू दिनी मोदींनी टाळ्या-थाळ्या वाजण्यास, घंटा-शंख नाद करण्यास सांगितले होते. मोदींच्या या उपक्रमाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दिवा लावण्याची संकल्पना मोदींनी जनतेसमोर मांडल्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. देशावर भयंकर संकट ओढावले असताना मोदींची ही संकल्पना अनेकांच्या पचनी पडली नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान काहींनी मोदींच्या या संकल्पनेचे स्वागत केले आहे.