PM Modi addressing the nation | (Photo Credits: DD News)

भारत देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंता उत्पन्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (3 एप्रिल) देशवासियांना संबोधित करत आहेत. जनता कर्फ्यूला तुम्ही दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यातून अनेक देशांना धैर्य मिळाले असे पंतप्रधान मोदी म्हणाले. लॉकडाऊन काळात आपण घरात एकटे आहोत असं समजू नका संपूर्ण देशावासियांचा पाठिंबा तुमच्यासोबत आहे. कारण हा सामूहिक लढा आहे. कोरोनाच्या संकटाचा अंधःकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना केले. घरातील सर्व दिवे बंद करुन दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅश लाईटच्या माध्यमातून कोरोनाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रयत्न करा. आपण एकत्र आहोत ही एकजूट दाखवण्याचा मार्ग सांगितला आहे. तसंच यामुळे कोरोनाच्या संकटामुळे गरिब जनतेच्या मनात जी निराशा निर्माण झाली आहे ती दूर होऊन त्यांचे मनोबल वाढेल असेही मोदी म्हणाले. विशेष म्हणजे आपल्या घराच्या गॅलेरीतून किंवा दारातून दिवा प्रज्ज्वलित करायाचा आहे. त्यासाठी रस्त्यावर कोणतीही गर्दी करुन नका असेही मोदींकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमातून लॉकडाऊनमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली होती. तसंच नागरिकांचे मनोबल वाढवत 'इमोशनल नव्हे सोशल डिस्टसिंग वाढवा' असा संदेश दिला होता. कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या उपाययोजना राबवणार त्यासह लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का असे असंख्य विचार देशवासियांच्या मनात आहेत. त्यानंतर आज मोदी काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. (भारतातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 2069 वर पोहोचली, 53 रुग्णांचा मृत्यू, 155 जणांना डिस्चार्ज)

ANI Tweet:

पहा व्हिडिओ:

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 2000 च्या वर गेली असून अनेक राज्यांमध्ये दिवसागणित कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या 423 झाली असून कोरोनाचे रुग्ण आढळलेली अनेक ठिकाणं सील करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर काल (2 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला.