देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार केले जात आहेत. त्यामुळे बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आनंद सुद्धा व्यक्त केला जात आहे. तर गोवा (Goa) हे देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डॉक्टरांचे आभार मानले होते. त्यानंतर आता गोव्यात लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम राहणार आहे. परंतु लॉकडाउन वाढू सुद्धा शकतो पण आर्थिक कामांना सूट देण्यात येणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्याच्या सीमा मात्र बंदच ठेवण्यात येणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
गोव्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नसला तरीही तेथील स्थानिक प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहेत. गोव्यात अद्याप दारुची दुकाने. रॅस्टॉरंट, बार, मसाज पार्लर, सिनेमागृह, नाईट लाइफ यावर अद्याप बंदी कायम असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. देशात 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन हॉटस्पॉट ठिकाणी काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाउनचे नियम सुद्धा शिथिल केले आहे. मात्र गोव्यात स्थानिक प्रशासनाकडून आर्थिक कामांना सूट दिली आहे. तसेच मत्सविक्रेत्यांना मासे विकताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. नाहीतर त्यांनी माशांची घरपोच डिलिव्हरी करताना नियमांचे पालन करावे अशा सुचना ही दिल्या आहेत.(Coronavirus: 30 जून पर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही! उत्तर प्रदेश साठी योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय)
#COVID19 related lockdown which is scheduled to end on May 3, should be extended further, with relaxations for economic activities within the state but the borders should be sealed: Goa CM Pramod Sawant pic.twitter.com/bafoCX6bVC
— ANI (@ANI) April 27, 2020
दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा 27892 वर पोहचला आहे. तर 872 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशभरात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व स्तरातून मदत केली जात आहेत. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यामध्ये लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण चर्चा सुद्धा झाली आहे. त्यामुळे आता येत्या 3 मे नंतर लॉकडाउन बाबत काय निर्णय जाहीर केला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.