उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Photo Credits : IANS)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये 30 जून पर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath)  यांनी दिले आहेत. रविवारी त्यांच्या निवास्थानावर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढण्याची भीती असते अशावेळी खबरदारी म्हणून 30 जून पर्यंत कोणत्याही कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच उत्तर प्रदेशात, पुल टेस्टिंग (Pool COVID19 Testing) म्हणजेच मोठ्या प्रमाणात कोरोनाची (Coronavirus)  चाचणी करण्यावर भर द्यावा असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांची एकूण संख्या 27,892 तर 872 कोरोना बाधितांचा मृत्यू

योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत केलेल्या मुख्य सूचना

- 30 जून पर्यंत राज्यात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही.

-राज्यभरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी जमा होऊ देऊ नका.

-पेट्रोलिंग वाढवा आणि सोशल डिस्टन्सिंगची प्रभावीपणे अंमलबजावणी करा.

-कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी आवश्यक आहे, त्यावर भर द्या.

-कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी आहे, डॉक्टर, परिचारिका, सेमी-डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांचा कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय संसर्गापासून बचाव व्हायला हवा.

-देशाच्या वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या उत्तर प्रदेशमधील रहिवाशांना स्वतंत्र निवासाची तयारी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यात परत आणले जाईल.

दरम्यान उत्तर प्रदेशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे लॉक डाऊन पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी अलीकडे आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा हजेरी लावली नव्हती. आतापर्यंत या राज्यात 1,868 कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. 289 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 29 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.