कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतात हाहाकार माजविला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,892 वर पोहोचली असून 872 रुग्ण दगावले आहेत. तर 6185 बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या भारतात 20, 835 रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1396 नवे रुग्ण आढळले असून 48 रुग्ण दगावले आहेत.
जगभरात कोरोना बाधितांची संख्या 29 लाखांच्या वर पोहोचली असून अमेरिकेत अक्षरश: या विषाणूने थैमान घातले आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1,330 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 9 लाखांच्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरुच! गेल्या 24 तासांत 1,330 कोरोना बाधित रुग्ण दगावले
India's total number of #Coronavirus positive cases rise to 27,892 (including 20835 active cases, 6185 cured/discharged/migrated and 872 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/4pWA2whFZw
— ANI (@ANI) April 27, 2020
महाराष्ट्रात (Maharashtra_ या आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या 8 हजारांच्या जवळ पोहचली आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 440 नवीन रुग्ण आढळले आणि या दरम्यान 19 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 358 प्रकरणे तर 12 जणांचा मृत्यू फक्त मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 5049 वर पोहोचले आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 323 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 7628 वर पोहोचली आहे.