Coronavirus: भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची लाट उतारास, 102 दिवसांमध्ये आकडा 40,000 हजारांनी घटला
Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महारामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढलेली भारताची चिंता काहीशी कमी (Coronavirus Infection Rate Decreased in India) होताना दिसत आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण आता घटू लागल्याचे आकडेवारीवरुन दिसते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवार, 29 जून) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात पाठिमागील 24 तासात 37,566 जणांना COVID-19 संसर्ग झाला. पाठिमागील 102 दिवसांच्या तुलनेत प्रथमच हा आकडा 40,000 हजारांच्या खाली आला आहे. मृत्यूचे प्रमाणही जवळपास 1000 च्या खाली आले आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 907 जणांचा मृत्यू झाला. 56,994 जणांना उपचार घेऊन बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 3,03,16,897 इतकी झाली आहे. त्यापैकी उपचार घेऊन बरे झाल्याने 2,93,66,601 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या 3,97,637 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशात आजघडीला कोरोना व्हायरस संक्रमित सक्रिय रुग्णांची संख्या 3,97,637 इतकी आहे.

देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांच्या बरे होण्याचे प्रमाण (रिकवरी रेट) वाढले आहे. हे प्रमाण जवळपास 96.87% इतके झाले आहे. साप्ताहीक पॉझिटीव्हीटीचा दरही 2.74% इतका राहीला आहे. तर प्रतिदिन कोरोना संक्रमाचा दर हा 2.12% इतका राहिला आहे. हा दर पाठिमागील 22 दिवसांपेक्षा 5% नी कमी आहे. कोरोना चाचणीचीबाबत बोलायचे तर 40.81 नागरिकांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. (हेही वाचा, Covid-19 3rd Wave: 6 ते 8 महिन्यांनी येणार कोरोना विषाणूची तिसरी लाट; दिवसाला 1 कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य- Dr NK Arora)

एएनआय ट्विट

दुसऱ्या बाजूला देशात कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणही सुरु आहे. देशात आतापर्यंत 32.90 कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. पाठिमागील 24 तासात कोरोना लसीचे 52,76,457 डोस देण्यात आले.

दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाने वेग पकडला असला तरी अद्यापही तो म्हणावा तितका नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येते की काय अशीही शंका काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीचे अधिकाधिक डोस लवकरात लवकर राज्य सरकारांपर्यंत पोहोचवावेत अशी मागणी होत आहे.