Coronavirus in India (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची भारतातील संख्या मोठ्या वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार 773 नव्या रुग्णांसह देशातील COVID-19 बाधितांची संख्या तब्बल 5194 वर पोहोचली आहे. त्यातील 401 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत कोरोना बाधित तब्बल 149 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या 4643 इतकी आहे.

कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. काल (7 एप्रिल 2020) रात्री देशातील कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या 4,789 इतकी होती. त्यापैकी सध्यास्थिती रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 4312 इतका होता. तर उपचारानंतर डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या 353 इतकी झाली होती. तर मृतांचा आकडा 124 इतका होता. त्यानंतर काहीच तासांनी प्रसिद्ध झालेली माहिती पाहता ते प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. (हेही वाचा, पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; शहरातील Covid 19 मुळे बळींचा आकडा 10 वर)

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. काल रात्री पर्यंत कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा महाराष्ट्रातील आकडा 1018 वर पोहोचला आहे. त्यापैकी त्यापैकी 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 79 लोकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज पुणे येथून 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.